शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जमीन प्रकरणात फसवणूक, पिता-पुत्राला अटक

456

मुंबई – जमीन खरेदी प्रकरणात कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांची आर्थिक फसवणूक झल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकरण समोर येताच उल्हासनगरमधील पिता पुत्राला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहन रूपानी व भारत रुपानी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गवळी यांचे वडील अनंता गवळी यांनी उल्हासनगरमधील पिटूमल रूपानी यांच्याकडून ४ वर्षापूर्वी कल्याण पूर्वेतील नांदिवली येथे ६६,००० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. दरम्यानच्या काळात खरेदीदार अनंता यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ पिटूमल यांचेही निधन झाले. याचा पिटूमल यांचे नातेवाईक मोहन व भारत रूपानी यांनी गैरफायदा घेतला. तसेच मृत पिटुमल व अनंता यांच्या विक्रीची बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार करून सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आणि जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला.

गुन्हे शाखेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोहन व भारत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहन व भारत फरार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ५ वर्षानंतर अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here