शिवसेनेकडून तिथीनुसार एकच शिवजयंती होणार; पदाधिकाऱ्यांनी केला ‘हा’ आवाहन

409

श्रीगोंदा :- शिवसेना पक्षाच्यावतीने तिथीनुसार एकच शिवजयंती होणार असून, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्राच्या मध्यामतून केले आहे.

या शिवजयंतीचे आयोजक शिवसेना तालुकाप्रमुख व शिवसेना शहर प्रमुख तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक/युवासैनिक असणार असे सांगितले आहे.

ही शिवजयंती शनि चौक या ठिकाणी साजरी होणार असून, दिनांक 21 मार्च 2022 वार सोमवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होईल. तर, हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून, संपन्न करण्यात येणार आहे. तरी, सर्व शिवसैनिक/युवासैनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बंधू, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख , शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर , शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे , विधानसभा संपर्कप्रमुख संजय जी खंडागळे , युवा सेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा तालुका शिवसेना/युवासेना महिला आघाडी, शेतकरी सेना, सर्व शिवसैनिक/युवासैनिक व सर्व अंगिकृत संघटना यांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्र माध्यमांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here