मुंबई – नुकताच लग्न करुन चर्चेत आलेले बॉलिवूड अभिनेता फरान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दोघांनीही लग्नसोहळ्यातील अनेक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण त्यांच्या एका फोटोशूटमधून शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नातील काही फोटोंमध्ये शिबानीचा बेबी बंप दिसत होता आणि आता नुकत्याच समोर आलेल्या फोटोशूटमध्येदेखील तिच्या पोटाचा घेर वाढलेला दिसत आहे. शिबानीने अलीकडेच प्री-वेडिंग बॅशचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिनं गोल्डन सिक्विन वर्क असलेला अतिशय सुंदर शॉर्ट स्कर्ट ड्रेस घातला आहे. सोबत फरहानदेखील पांढऱ्या सूटमध्ये दिसत आहे. पण या फोटोंमधील एक फोटो पाहून चाहत्यांनी शिबानीच्या प्रेग्नन्सीचा अंदाज लावला आहे. काही इंटरनेट युजर्सनी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या या फोटोवर कमेंट करून ‘तू प्रेग्नंट आहेस का?’ असा प्रश्नदेखील शिबानीला केला आहे.