अहमदनगर – प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित नांदुर ता राहाता शाळे मधील संगणक चोरी करणारे आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.रोहन विजय बोधक आणि रोहित शांताराम जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
6 जानेवारी रात्री 9.30 च्या सुमारास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित शाळा (नांदुर ता राहता) शाळेमधील डेल कंपनीचे ७ मॉनीटर, ७ सीपियु व संगणक साहित्य हे शाळेच्या संगणक कक्षाची पाठीमागील खिडकीची जाळी तोडुन आत प्रवेश करुन शाळेचे मुलांना शिकवण्यासाठी लागणारे संगणक हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये मधुकर सोपं वटे यांनी दिली होती.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेले मॉनीटर व सीपीयु हे आरोपी रोहन बोधक आणि रोहित जाधव याने चोरल्या असल्याची गोपनीय माहिती पोनि संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे तपास पथक यांनी नांदुर भागात सापळा रचुन रोहन बोधक याला शिताफिने पकडले. त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच गुन्हयातील ७ डेल कंपनीचे मॉनिटर व ७ डेल कंपनीचे सीपीयु व संगणक साहित्य हे मिळून आले तसेच त्याचा साथीदार रोहित शांताराम जाधव यास 21 फेब्रुवारी रोजी पाठलाग करुन पकडले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सदरची कामगिरी मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. संजय सानप, सपोनिरी बोरसे, पोना/ राशिनकर, पोना/ रघुवीर कारखेले, पोना/पंकज गोसावी, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/गौतम लगड, पोकों/गौरव दुर्गुळे, पोकॉ/ रमीजराजा आत्तार यांचे पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोना रघुवीर कारखेले हे करीत आहे.










