शहरात गावठी हातभट्टी दारूची विक्री,तोफखाना पोलिसांचा छापा

373

अहमदनगर – सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर गावठी हातभट्टी दारूची विक्री खुलेआम सुरू होती. तोफखाना पोलिसांनी छापा टाकून एकाला पकडले. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री करणाऱ्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अरूण शिंदे (वय २९ रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, साबेडी) असे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पाईपलाईन रोडवरील यशोदानगर कमानीजवळील
बाजार तळावर एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांना कारवाईचे आदेश दिले.

उपनिरीक्षक सोळुंके यांनी सदर ठिकाणी पोलीस अंमलदार यांच्यासह छापा टाकला असता शिंदे हा गावठी हातभट्टी विक्री करत असताना मिळून आला. त्याच्याकडून पाच हजार रूपये किंमतीची दारू जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here