वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मा. नगरसेवक ला अटक.

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी नगरसेवक संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.24 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी अहमदनगर शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यावसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता.

पोलिसांनी देहविक्री करणार्‍या दोन महिलांची सुटका केली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सलीकचंद सौदे (वय 59 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) व संजय बाबुराव गाडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गाडे पसार होता. तो तारकपूर परिसरात येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांंनी तारकपूर परिसरात सापळा रचून आरोपी गाडे याला ताब्यात घेत अटक केली.

आरोपी स न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here