वेळीचं धावून येऊन मदत केली, माणुसकी अजून जिवंत आहे: सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रवार बाजार मध्ये कपडा मार्केट रात्री 02.30 सुमारास आग लागण्याची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्ष यांना बोलून त्यांच्यामार्फत राहुरी, अहमदनगर, एमआयडीसी, व्ही आर डी अशा 04 अग्निशामक दलांना बोलावून घेऊन, ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देऊन, शहरातील पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेऊन 05.00 वा च्या सुमारास संपूर्ण आग विझलेली आहे. बाजारांमधील पंधरा दुकाने जळाली असून दहा दुकानांना जळण्यापासून पासून वाचवण्यात आले आहे. घटनास्थळी माननीय पोलीस उपअधीक्षक सोनवणे मॅडम, शहरातील तोपखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आर सी पी असे हजर होते. कुठलीही जीवित हानी झाली नाही.तात्काळ सर्व रात्र गस्त अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आल्याने त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड, ग्रामस्त त्यामध्ये भिंगार मधील नगरसेवक,काँटोमेन्ट चे अधिकारी,कर्मचारी आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी व वित्तहानी वाचवण्यात आली आहे.आपले सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!!! आपण वेळीचं धावून येऊन मदत केली, माणुसकी अजून जिवंत असल्याचे आपण याद्वारे दाखवून दिले??????????
आपला
सहाय्यक पोलीस निरीक्षक
कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here