अहमदनगर- सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रामदास ठकाजी शेळके यांची आई रखमाबाई ठकाजी शेळके (वय 94 रा . वाडेगव्हाण शिवार पारनेर फाटा ता.पारनेर) ही घराजवळ पारनेर फाटा ते पारनेर जाणारे रोडलगत मकाचे पिकाजवळील पडीक शेतात शेळी चारत असताना एक अनोळखी इसमने चाकुचा धाक दाखवुन गळयातील 30,000 रू.कि.ची गळयातील सोन्याची सुमारे दोन तोळे वजनाची पोत बळजबरीने हिसकावुन घेऊन आपल्या एका साथीदारासह फरार झाला होता.
या घटनेचा तपास करत असताना हा गुन्हा शाहरूख सलीम खान आणि हरीश किसन कोळपे यांनी केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरेलेला चाकु हस्तगत केला आहे.
वरील गुन्हयातील तपासाची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल ,पोलीस उपअधिक्षक अजित पाटील , पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पवार , सहाय्यक फौजदार सुनिल कुटे ,पोना कल्याण लगड , पोना यशवंत ठोंबरे यांनी केली पुढील तपास पोलीस नाईक यशवंत ठोंबरे हे करीत आहेत .












