वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी : वाकळे मध्यमंडल भाजपाच्यावतीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

784

अहमदनगर : दिवसेंदिवस पर्यावरण होत असलेल्या बदलामुळे त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे
मनुष्याच्या आरोग्यवरही परिणाम होत आहे. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे. प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन एक झाड लावून आपण कर्तव्य बजावावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये भाजपाच्यावतीने सात दिवस सामाजिक उपक्रम राबविणार आहे. यामध्ये वृक्षारोपण, फळवाटप, अन्नधान्य वाटप, दिव्यांगांना वस्तू वाटप व स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविले जातील. भाजपा मंडलाध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सोनाली चितळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा
शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन व्हावे, यासाठी
करणार आहे. वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येकाने आपले काम केले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सोनाली चितळे यांच्यावतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करताना महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजपाशहरजिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, मनोज ताठे,
अजय ढोणे चितळे सर आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र गंधे म्हणाले की, वृक्षारोपण ही योजना अंमलात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही योजना फोटोपुर्ते मर्यादित न राहता, त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखावा.
यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना राबविले आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या योजना पोहचावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यमंडल भागामध्ये ७० झाडे लावण्यात आले. तसेच प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकाला दत्तक झाड योजना राबविणार आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, मनोज ताठे, अजय ढोणे , चितळे सर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here