मुंबई – नुकताच क्रिकेटमधून निवृत्त होणार भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंग याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडल वरून दिली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करून घेण्यास सांगितले आहे.
मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना मी लवकरात लवकर चाचणी करून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या अशी माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
कसोटीत 400 हून अधिक बळी घेणारा हरभजन सिंग हा भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळेने हा पराक्रम केला आहे. भज्जीने 103 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 417 विकेट घेतल्या आहे. तर 236 वनडेत 269 विकेट घेतल्या आहे. तर 28 टी-20 सामन्यांमध्ये भज्जीने 25 विकेट घेतल्या आहे. आयपीएलमध्ये हरभजनने 163 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहे.हरभजन दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. हरभजन 2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.