विशेष मोक्का न्यायालयाकडून कुख्यात सागर भांड व त्याच्या साथीदारास आठ दिवसाची पोलिस कोठडी

377

अहमदनगर – जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.

या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अहमदनगर पोलिसांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे.

Dy.s.p संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या गुन्ह्यातील आरोपींनी राहुरी येथील दुय्यम कारागृह चे गज कापून पलायन केल्यामुळे PI इंगळे सह अन्य सहा पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत. पोलिस त्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

सरकारी पक्षातर्फे ॲड. दिवाने व Dy.s.p संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली.आरोपीच्या बाजूने ॲड. बाफना व ॲड. सरिता साबळे यांनी काम पाहिले.

1) सागर भांड (टोळी प्रमुख)
2) निलेश संजय शिंदे (टोळी सदस्य)
3) गणेश रोहिदास माळी (टोळी सदस्य)
4) रमेश संजय शिंदे (टोळी सदस्य) असे आरोपींचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here