विवाहितेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद..

338

अहमदनगर – फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टोबर २०२१ मध्ये मनोज याच्यासोबत फिर्यादी महिला एमआयडीसी येथील साईबन येथे गेल्यानंतर फिर्यादी महिला पाणी पिल्याने तिला झोप आली. यानंतर मनोज याने तिच्यासोबत संबंध केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चांदबिबी महाल येथे गेल्यावरही नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देत मनोज याने फिर्यादी महिलेसोबत संबंध केले.

फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. याप्रकरणी पीडिताने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here