अहमदनगर – माहेरून पैसे व सोन्याची अंगठी आणण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेचा पती व सासु-सासऱ्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.
पती अक्षय रामदास गुंजाळ, सासरे रामदास दुर्गा गुंजाळ, सासु सुनीता रामदास गुंजाळ (रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे). अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २ जून २०१६ रोजी विवाह झालेला असून दोन मुले व एक मुलगी आहे. त्यानंतर दोन- तीन वर्ष व्यवस्थित नांदविले. भावाने पतीला उत्पन्नाचे साधन म्हणून एक रिक्षा घेऊन दिली होती. मात्र, त्यानंतर आईकडुन पैसे व एक तोळयाची सोन्याची अंगठी आणून दे, असे कायम म्हणत होते.
सासरच्या लोकांनी किरकोळ घरगुती कारणातून त्रास देण्यास सुरूवात केली. भरोसा सेल येथे पती व सासरच्या लोकांविरूध्द तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु ते तारखेला हजर न राहिल्याने समझोता झाला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे