लॉकडाऊननंतर 99 टक्के सेक्स वर्कर्स बाहेर पडण्याच्या तयारीत
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर आता वेश्या व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे, मात्र अशातच देशातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.
बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तब्बल 99 टक्के महिला रोजीरोटीसाठी दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत, असं आशा केअर ट्रस्टने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. लॉकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीमुळे रेड लाईट एरियात पुरुष फिरकत नसल्याने इथल्या महिलांवर आर्थिक संकट ओढावलं.
यातून अनेक महिला कर्जबाजारी झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. 85 टक्के महिलांनी कर्ज घेतलं असून यातील 98 टक्के महिलांनी वेश्यालय मालक, व्यवस्थापक आणि सावकारांकडून हे कर्ज घेतलं आहे.









