लहान मुलांच्या दुचाकी प्रवासासाठी केंद्र सरकारने आणले नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा हजार रुपये दंड …

437

मुंबई – रस्त्यांवर होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी नियमावली आखली आहे. या नवीन वाहतूक नियमांनुसार दुचाकीस्वारांना मुलांसाठी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे अनिवार्य केले आहे, तसेच दुचाकीचा वेग फक्त ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. हा नियम चार वर्षांपर्यंतच्या मुलांना लागू असेल. नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस हलके, जलरोधक, गादीयुक्त आणि ३० किलो भार वाहून नेण्याची क्षमता असणारे हवे. राइडरने मुलाच्या सुरक्षिततेसाठी हार्नेस घालणे आवश्यक आहे.

दुचाकी वाहनांसाठीच्या नवीन नियमांमध्ये चार वर्षांवरील मुलांनाही क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपैकी असायला हवं. मुलांसाठी हेल्मेट बनवण्यास केंद्राने निर्मात्यांना आधीच सूचित केले आहे.

दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने नियमात बदल सुचविणारी एक मसुदा अधिसूचना जारी केली होती. यात रायडर्सना सेफ्टी हार्नेस आणि लहान मुलांसाठी क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here