मुंबई – प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची पुन्हा एकदा प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.