रोटरी कोविड सेंटर मधून एक हजाराव्या रुग्णला डिस्चार्ज
रोटरीने कोविड सेंटर सुरु करून सर्वसामन्यांचे करोडो रुपये वाचवले – महापौर बाबासाहेब वाकळे
अहमदनगर – करोना बाधितांसाठी रोटरी क्लबने नुसतेच कोविड सेंटर सुरु न करता यशस्वीपणे चालवून करोना बाधित रुग्णांसाठी मोठे काम केले आहे. येथून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील कोविड सेंटर मध्ये या सेंटरने चांगले नवलैकिक मिळवले आहे. आज एक हजाराव्या रुग्णाला डिस्चार्ज देतांना मोठा आनंद व अभिमान वाटत आहे. यापुढील काळात नगर शहरातील रुग्ण वाढू न देता लवकरात लवकर ही महामारी नियंत्रात आणण्याचा प्रयत्नात महापालिका आहे. याकामी रोटरी क्लबचे मोठे सहकार्य मिळत आहे. करोना बाधितांना उपरासाठी आज एका रुग्णाला हजारो रुपये लागत आहेत. मात्र रोटरी क्लबच्या या कोविड उपचार सेंटर मध्ये रुगांना मोफत सर्व सुविधा मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे करोडो रुपये रोटरीने वाचवले आहेत. याबद्दल सर्व रोटरी क्लबचे अभिंनदन. या चांगल्या कामाला महापालिकेचे सर्वस्वी सहकार्य राहील, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
नगरच्या पाच रोटरी क्लबच्या पुढाकारातून व महानगरपालीकेच्या सहकार्याने पॉलीटेक्निक महाविद्यालयात सुरु असलेल्या रोटरी कोविड उपचार सेंटर या मोफत उपचार केंद्रातून आज एक हजारावा रुग्ण पूर्ण बरा होवून डिस्चार्ज घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज घेणाऱ्या एक हजाराव्या रुग्णाला उत्साहात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रोटरी क्लब अहमदनगरचे अध्यक्ष अॅड. अमित बोरकर, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितिज झावरे, सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवले, रोटरी क्लब इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी, सचिव ईश्वर बोरा, दिगंबर रोकडे, आरोग्याधिकारी डॉ.सतीश राजूरकर, राकेश कोतकर, शशिकांत नजन, जालिंदर शिंदे, विद्या जोशी, मेहेरप्रकाश तीवारी, योगिता मुथा, प्राजक्ता डागा, श्रीलता आडेप, आदित्य गांधी, केतन मुथ्था, अमोल शिंगी, विनीत बोरा, हर्ष बोरा आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात क्षितिज झावरे म्हणाले, गोर गरीब व गरजू नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसल्याने रोटरीच्या सर्व पाच क्लब एकत्र येत येथे हे मोफत कोविड उपचार सुरु केले. या ठिकाणाहून सर्व रुग्ण उपचार घेऊन वेगाने बरे होत घरी गेले आहे. तसेच आजपर्यंत एकही मूत्यू याठिकाणी झालेला नाहीये. सर्व रुग्णांना औषधोपचारा बरोबरच चंगल्या सुविधा, सात्विक भोजन, आयुर्वेदिक काढे, व्यायाम व योगासनांचे मार्गदर्शन मोफत मिळत आहे











