मुंबई – जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच मागच्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सार्वजणांना कोरोनाची चाचणी करून घेण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार सुरु केला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कि मला कोरोना ची लागण झाली आहे मात्र काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
तर दुसरीकडे मागच्या चोवीस तासात राज्यात काल दिवसभरात करोनाचे ४०,८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७,३७७ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातल्या आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या नागरिकांची एकंदर संख्या ७०,६७,९५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९४.१५ टक्के आहे. सध्या राज्यात करोनाचे २ लाख ९३ हजार ३०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात आता पर्यंत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. यातले काहीजण नुकताच करोनामुक्त झाले आहेत.










