मुंबई – केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . संजय राऊत यांचा डोळा मुख्यमंत्रीपदावर असल्याच्या त्यांनी आपल्या पत्रकार परिषदमध्ये म्हटले आहे.
नारायण राणे यांनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की ते आम्हाला अटक होईल म्हणतायत, आम्हाला अटक होऊ दे. विनायक राऊत यांनी शिवालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका योग्य पद्धतीने मांडली आहे. मला माहीत नाही कोण काय बोललंय ते. विनायक राऊतांनी जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते राणे?
संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला? असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.