राज्यात शाळा कधी सूरु होणार, राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले उद्या..

439

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून संपुर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा ( Corona Virus) प्रसार झपाट्याने वाढत आहे. याच बरोबर राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या देखील आता दिवसाला 30 हजार पेक्षा जास्त येत आहे.(When will the school start in the state, Rajesh Tope gave important information, said tomorrow ..)

या वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा कहर पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा शाळा (School) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या महिन्यात कोरोनाबधित रुग्ण कमी झाल्याने दोन वर्षानंतर राज्यात शाळा सुरू करण्यात आले होते.

माञ पुन्हा एकदा अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शाळा बंद कराव्या लागले आहे.. आता पुन्हा शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. राज्यात पुन्हा शाळा सुरु करायच्या की नाहीत, याबाबत उद्या मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

कोरोना काळात सर्वांनीच लस घेतली पाहिजे. कोरोना टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. टेस्टचा अहवाल व्यवस्थित मिळाले तर रुग्णांची माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि त्यावर योग्य ते उपाययोजना करणे सोपं होईल. शाळा सुरु करण्याबाबत कॅबिनेटमध्ये उद्या चर्चा होईल, पालक, संस्था चालक, टास्क फोर्स, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन उद्या निर्णय घेतला जाईल, असे मंत्री राजेश टोपे म्हणाले. त्यामूळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.(When will the school start in the state, Rajesh Tope gave important information, said tomorrow ..)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here