श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरातील घारगाव परिसरात रस्त्याच्या वादावरून हाणमार करुन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र आता पर्यंत पोलीसांनी करवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणात जांभळाबाई गरमलाल भोसले यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे की ते गरमलाल भोसले( पती) सोन्याबापु व अशोक भोसले यांच्यासह खोमणे मळगा, घारगाव ता. श्रीगोंदा राहत आहे. तसेच हे कुटुंब थोरजा येथे वाट्याने काम करतो.
फिर्यादी यांच्या पतीने (गरमलाल) यांनी 30-35 वर्षांपूर्वी अनिल आसाराम चौधरी यांची एक एकर शेती खरेदी केली होती. त्यांच्या शेजारीच अशोक भानुदास खोमणे याचे शेत असून ते त्यांच्या शेतात व भोसले कुटुंब त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या दोघांमध्ये शेतात जाण्या येण्याचा रस्त्याना व अतिक्रमण केले बाबत प्रांत अधिकारी अहमदनगर येथे केस चालू आहे.
दि. 27 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास फिर्यादी आपल्या घरात कुटुंबासह बसले असता अशोक भानुदास खोमणे ,शिवाजी अशोक खोमणे, रेखा अशोक खोमणे आणि हनुमंत अशोक खोमणे सर्व (रा. खोमणे वस्ती पारगाव) हे सर्व घरा समोर येऊन तुम्ही आमच्या शेतात ये-जा का करता ? तुम्ही पारदी लोक लय माजलेले आहे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण केल्याने डोळ्यांतून पळापळा रक्त वाहू लागले.
त्यांनतर फिर्यादी बेलवंडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता डॉक्टरांनी पुढच्या उपचारासाठी
ससुन हॉस्पिटल पुणे पाठविले तेथील डॉक्टरांनी फिर्यादी यांना तुमचा डावा डोळा निकामी झाला याबाबत सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
मात्र राजकीय दबावामुळे आणि आर्थिक पाठबळामुळे आरोपीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप भोसले कुटुंबाकडून करण्यात आला आहे.