दिल्ली- हिट अँड रन अपघातात प्रकरणात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमात बदल करत पीडित व्यक्तीसाठी १२,५०० रुपये ऐवजी ५०,००० रूपयांची नुकसान भरपाई घोषित केली आहे. त्याच बरोबर रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांची भरपाई २५ हजार रुपये ऐवजी २ लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. हा नियम १ एप्रिल २०२२ पासून भारतात रस्ते वाहतूक आणि राजमार्गवर हा नियम लागू करण्यात येणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘रिजिड’ वाहने आणि दुचाकी वाहून नेणाऱ्या ट्रेलरमध्ये जास्तीत जास्त तीन डेक ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वाहून नेण्याची क्षमता ४० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. ट्रेलरचा कॅरेजचा भाग ड्रायव्हरच्या केबिनच्या वर नसावा, अशी अटही ठेवली आहे.
रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला अधिसूचना जारी करून केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन करून रिजिड व्हीकल आणि ट्रेलर मध्ये टूव्हीलरसाठी जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली आहे.
वेगळ्या जारी अधिसूचनेत मंत्रालयाने म्हटले की, पैसा घेऊन जाणाऱ्या गाड्या (कॅश व्हॅन) भारतीय मानक ब्यूरो अधिनियम २०१६ अंतर्गत (बीआयएस) नियम अधिसूचित होण्यापर्यंत वाहन उद्योग मानक १६३:२०२० च्या कमीत कमी कालावधीत पूर्ण करतील. यावरून कॅश व्हॅनच्या विशेष उद्देशीय वाहन रुपात विनिर्माण, टायर, मंजुरी परिक्षण आणि नोंदणी करण्यास मदत मिळेल.











