रात्रीच्या वेळी गाडया अडवुन रस्ता लुट करणारा केला गजाआड – तोफखाना पोलीसांची दमदार कारवाईअहमदनगर (प्रतिनिधी २२)रात्रीच्या वेळी गाडया अडवुन रस्ता लुट करणारा विनोद उर्फ पांड्या कडू बाळ सरकाळे राहणार सर टाकळी ता शेवगाव याला केले गजाआड तोफखाना पोलीसांची दमदार कारवाई . दि .11 / 10 / 2021 रोजीचे पहाटे 05:30 वा . चे सुमा . तोफखाना पोलीस स्टेशन हति समाधान हॉटेलचे जवळ , कल्याण बायपास रोड , अहमदनगर येथे पिक अप गाडीला मोटार सायकल आडवी लावुन गाडीला कट का मारला असे म्हणुन चाकुचा धाक दाखवुन पिक अप गाडीवरील ड्रायव्हरचे खिश्यातील 15,800 / – रुपये काढुन नेले बाबत तोफखाना पो.स्टे . ला भा.द.वि.क .392 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे आदेशान्व्ये पो.उप निरी . श्री . समाधान सोळंके यांचेकडेस देण्यात आला होता . पोलीस उपनिरीक्षक श्री . समाधान सोळंके यांनी सदर गुन्हयाचा तपास वेगाने फिरवुन यातील आरोपी नामे 1 ) विनोद ऊर्फ पांडया कडुबाळ सरकाळे वय 27 वर्षे रा.शहरटाकळी ता.शेवगांव जि . अहमदनगर यास अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील गेला माल हस्तगत करुन इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न केले आहेत . सदरची कारवाई हि मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील , मा . अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर श्री अजित पाटील. यांचे सुचना व मार्गदर्शखाली महिला पोलीस निरीक्षक श्री . ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके , पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे , पोलीस नाईक अविनाश वाकचौरे , पोलीस नाईक अहमद इनामदार , पोलीस नाईक वसीम पठाण , पोलीस नाईक पिनु गायकवाड , पोलीस नाईक शैलेश गोमसाळे , पोलीस कॉन्स्टेबल धिरज खंडागळे , पोलीस कॉन्स्टेबल सतिष त्रिभुवन , पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली असुन सदर कारवाईमुळे रस्तालुट करणान्या आरोपीस जेरबंद करण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
धक्कादायक! पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल
पुणे - लष्करातील जवानाने पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, सध्या.रा....
प्रबळ गटांची नैतिकता कायदे बनवते: CJI
नवी दिल्ली: स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर टिकून आहे, असे भारताचे सरन्यायाधीश धनंजय वाय चंद्रचूड यांनी शनिवारी...
आरोपी तसेच मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या जामिनावरील सुनावणी लांबणीवर
औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे-पाटील यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली...












