अहमदनगर – शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या युवतीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शाम साठे (रा. नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.
सन २०१८ ते जानेवारी २०२२ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मयुर साठे व फिर्यादी युवती यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मयुरने बळजबरीने इच्छेविरूध्द रूममध्ये, हॉटेल व लॉजवर घेऊन जात अत्याचार केला. फिर्यादी युवतीने मयुरकडे लग्न करण्याची मागणी केली असता, तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मयुर साठे व इतरांनी फिर्यादी युवतीला मागील आठवड्यात मारहाण केली होती. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.