अहमदनगर – हात ऊसणे दिलेल्या पैशाची मागणी करण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता येथील कोठला परिसरातील घासगल्लीमध्ये ही घटना घडली. राजू मारूती कासार (वय २२ रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे.
राजू कासार याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा जम्या शेख (पूर्ण नाव माहिती नाही. रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुने जम्याला हात उसणे पैसे दिले होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राजूने जम्याच्या घासगल्ली येथील घरासमोर जाऊन हात उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली.
याचा राग जम्याला आल्याने त्याने राजुला शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केले. जम्याची पत्नी राजुला म्हणाली, “ तू जर परत पैसे मागण्यास आला तर मी तुझ्यावर केस दाखल करील”. असे म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक आप्पा तरटे करीत आहेत.