*युथ आयकॉन चे सिईओ सबील सय्यद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित !
*चिचोंडी पाटील : या ग्रामीण भागातून सुरू झालेली , युथ आयकॉन फाऊंडेशन ही संस्था. मागील तीन वर्षांपासून विविध सामाजिक , शैक्षणिक , क्रीडा , तंत्रज्ञान , माहिती व प्रसार , शेती विषयक , आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे ! युथ आयकॉन फाउंडेशन च्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये मुख्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल रिसर्च बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज च्या माध्यमातून ६५० कोर्स राबवले जातात विविध ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुरु करून युवकांना ट्रेनिंग आणि रोजगार देण्याचे काम केले जाते. त्यानंतर युथ कराटे फेडरेशन च्या माध्यमातून मुलींना व महिलांना मोफत कराटे प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वरक्षणाचे धडे दिले जातात. तसेच शेतकऱ्यांना देखील आयुर्वेदिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे काम युथ आयकॉन फाउंडेशन वेळोवेळी करत असते. युथ आयकॉन फाउंडेशनच्या डिजिटल गुरुकुल वेबसाईट अंतर्गत लॉकडाऊन मध्ये. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम केले होते. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून युथ फाउंडेशन च्या वतीने लॉकडाउनच्या च्या काळात गोरगरिबांना किराणा वाटप , गरजूंना मास्कचे वाटप , कोरोना संदर्भात जनजागृती , असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून मदत पाठवली गेली. युथ आयकॉन फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्यासह देशात विविध प्रकारचे प्रकल्प राबवित आहे या सर्व कार्याची दखल घेत ! युथ आयकॉन फाउंडेशन चे सीईओ सबील सय्यद यांची निवड राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार साठी करण्यात आली होती दिनांक २४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मध्ये , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य पुरस्काराने सबिल सय्यद यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारची संलग्न असणारे , नेहरू युवा केंद्र , औरंगाबाद तसेच फा-हियान शोतोकोन कराटे असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. या या कार्यक्रमाचे आयोजक अरुण पाईकडे आणि नितीन सूर्यवंशी हे होते. यावेळी थायलंडचे महंत वंदनीय बोधीपालो महाथेरो , यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के , पत्रकार रफिक शेख , संजय वायकर , साहिल सय्यद , अकील शेख , ॲडवोकेट शीतल बेद्रे , फरीद सय्यद , मयुरेश बुचकूळ आदि मान्यवर उपस्थित होते. चौकट – हे पुरस्कार माझे एकट्याचे नसून युथ आयकॉन फाउंडेशन मधील प्रत्येक सदस्याचा यामध्ये खारीचा वाटा आहे. मला कायमच विशेष सहकार्य करणारे माझे मित्र शिवा म्हस्के , रफिक शेख , संजय वायकर , माझे आई-वडील आणि माझे सहकारी टीम , या सर्वांना या पुरस्काराचे श्रेय जातो !*सबील सय्यद**संस्थापक आणि सीईओ युथ आयकॉन फाउंडेशन*