या कारणाने प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही, जाणुन घ्या कारण

462

मुंबई – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपुर्वी प्रसारमाध्यमात रंगली होती. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी गुप्त बैठक केल्याच्याही चर्चा होत्या.

मात्र, नंतर प्रशांत किशोर यांनी सार्वजनिकपणे काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत काँग्रेस प्रवेशाचा निर्णय न झाल्याचे स्पष्ट संकेत दिले. यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावर बोलताना प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश का होऊ शकला नाही यावर भाष्य केलंय.

एक मुलाखतीत प्रियंका गांधी म्हणाल्या, प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. मला वाटतं यामागे अनेक कारणं होती त्यामुळेच ही भागीदारी होऊ शकली नाही. काही कारणं त्यांच्याकडून होती, तर काही कारणं आमच्याकडून होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्द्यांवर सहमत होणं शक्य नव्हतं त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

काँग्रेसमध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश न देण्याचा मतप्रवाह असल्याने प्रशांत किशोर यांना पक्ष प्रवेश दिला नाही हा आरोप प्रियंका गांधी यांनी फेटाळला. असं असतं तर प्रशांत किशोर यांच्यासोबत इतक्या पुढच्या स्तरावर चर्चा का झाली असती असा सवाल करत त्यांनी हे कारण नाकारलं. प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता तयार झाली होती हेही मान्य केलं. मात्र, काही कारणांमुळे तसं होऊ शकलं नाही, असं नमूद केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here