मुंबई – सोशल मीडियावर नेहमी काहीना काही कारणाने बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन चर्चेत असते. नुकताच तिने आपल्या वजन बद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर विद्या चर्चेत आली आहे.
अभिनेत्री विद्या बालनला अगदी तरुणावस्थेत असतानाही बॉडीशेमिंगसारख्या प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे.
एका मुलाखतीत विद्याने तिच्या वाढत्या वजनाविषयी एक खुलासा केला आहे. तिचं वजन का कमी होत नाही हे तिने सांगितलं आहे.
माझ्यात हार्मोनल इम्बॅलेन्सची समस्या आहे. त्यामुळे मी कितीही डाएट केलं, वर्कआऊट केलं किंवा वजन कमी करण्यासाठी कोणताही नवा प्रयोग करून पाहिला तरीदेखील माझ्या वजनात काही फरक पडत नाही. या हार्मोनल इम्बॅलेन्समुळे माझं वजन कमी होत नाही, असं विद्याने सांगितलं.












