जळगाव – जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्ग पाहता जमावबंदी लागू आदेश लागु करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय, सामाजिक मोर्चा काढण्यात बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील मोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचा गुरुवारी दि. २७ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनामुळे जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना जामनेरात मोर्चा काढल्याप्रकरणी आमदार गिरीश महाजन यांच्यासह ९ जणांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस स्थानकात दाखल फिर्यादीनुसार, आ. गिरीश महाजन यांच्यासह उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाबूराव घोंगडे, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, महेंद्र बाविस्कर, नामदेव मंगरूळे, शेख अनीस, शेख नाजीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











