अहमदनगर – महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने करवाई करत अटक केली आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर किसन गजरे,(वय २७ , रा . निघोज , ता . पारनेर) यांनी ट्रक लघुशंकेसाठी रस्त्याचे कडेल थांबविला असता अज्ञात तीन आरोपी ट्रकचे केबिनमध्ये घुसून फिर्यादी व क्लिनर साक्षीदार यांना कोयता व चाकुचा धाक दाखवून , मारहाण करुन ४६ हजार रु.कि.ची रोख व दोन मोबाईल फोन बळजबरीने चोरुन घेवून नेले होते
या गुन्हेचा तपास करत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी ,पोलीस नाईक सुरेश माळी , पोलीस नाईक विशाल दळवी , पोलीस नाईक संतोष लोढे ,पोलीस नाईक शंकर चौधरी , पोलीस नाईक देवेंद्र शेलार , पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे व चापोहेकॉ बबन बेरड अशांनी मिळुन आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी सोमनाथ खलाटे हा गेवराई , जिल्हा बीड येथे आहे.
या माहितीवरून पथकातील अंमलदार बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून एमआयडीसी पोस्टे येथे हजर केले आहे . पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे .