मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

369

अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील कंपनीच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करून कॉपर पट्ट्यांचे दहा बँक्स पळविणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

सागर गोरख मांजरे (वय २५, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी शिवाजी भागाजी कुदनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इलेक्ट्रानिक कंपनी सुरक्षारक्षक सोन्याबापू विजय पाळसकर व विलास परसराम नेवसे यांना मारहाण करून कॉपर पटयांचे दहा बॉक्स आरोपीने चोरून नेल्याची घटना घडली होती.

या घटनेतील मुख्य आरोपी मांजरे हा कल्याण रोड परिसरात येणार असल्याची माहिती ‘स्थानिक गुन्हे शोखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने आरोपीला सापळा लावून कल्याण रोड परिसरातून ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here