मुळानगर येथील नादरूस्त पंप चालू करणेसाठी पंपाची चाचणी

दि.२१/०९/२०२१ रोजीअहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेवरिल महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी शट-डाऊन घेण्यात आला. तद्नंतर गुरूवार पासून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु दीनांक २३/९/२०२१रोजी रात्री १०.०० ते ११.०० दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला, तसेच आज मुळानगर येथील नादरूस्त पंप चालू करणेसाठी पंपाची चाचणी घेण्यात आली. यामुळे शहरातील सुरू असलेला पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही.

त्यामुळे शनिवार दि.२५/०९/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, माळीवाडा (काही भाग), बालीकाश्रम रोड इ. भागात पाणी पुरवठा होणार नसुन तो दि.२६/०९/२०२१ रोजी करण्यात येईल.

त्याच प्रमाणे रविवार दि. २६/०९/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, कचेरी परिसर, दाळमंडई, धरतीचौक, माळीवाडा, बंगाल चौकी, इ. भागासह सोमवार दि.२७/०९/२०२१ रोजी करण्यात येईल.

तसेच यादरम्यान शिवाजी नगर, शांती नगर इत्यादी परिसरात जास्त दिवससंचा गॅप झाला आहे, अशा ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here