अहमदनगर – नगर तालुक्यातील मेहेकरी येथील ३ वर्षेच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रनजीत मारग ,पोलीस नाईक अजहर सय्यद , पोलीस नाईक सचिन वनवे ,पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले आदीच्या पथकातील पोलिसांनी व गावातील युवकांनी व गावकऱ्यांनी अपहरण करणा-याची शोध मोहिम राबवून आरोपी सागर आनंदा सुरे वय २३ रा-पिसोरा ता.कन्नड ( जि.औरंगाबाद )याच्या तावडीतून मुलीस सोडवण्यात आले आहे. आरोपी सागर सुरे याला अटक केली आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मेहकरी येथे गरीब कुटुंबात ३ वर्षाची मुलगी होती. आरोपी सागर सुरे याने नगर पाथर्डी रोड वरती येथील एका किराणा दुकाना शेजारी राहत असलेल्या वस्तीवरील तीन वर्षाच्या मुलीला मोटर सायकल वर बसून पाथर्डी च्या दिशेने निघाला होता सदर घटना किराणा दुकानदार यांना हा अनोळखी इसम असल्याने त्यांनी तत्काळ मुलींच्या आई घरासमोर धुणे धूत होत्या त्यांना सदर घटनेची माहिती दिली .
मुलीच्या आईने त्यांच्या सासू यांना सांगितले सासूने आपल्या मुलाला तात्काळ फोन करून याची माहिती दिली लगेच मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर लगेच तात्काळ नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील पोलिस पथक व गावकऱ्यांनी अपहरण केलेल्या मुलीचा शोध घेऊन मुलीस नगर पाथर्डी रोडवर मेहेकरी-कौडगाव दरम्यान आरोपीच्या कब्जामधून सोडविले. नगर तालुका पोलिसाच्या पथकांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. आरोपी याने दारूच्या नसेमध्ये घटना केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.
त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी आरोपीची कालच मेडिकल केले त्यामध्ये आरोपीने कोणत्याही प्रकारचे दारू पिलेल्या नाही असे रिपोर्ट मध्ये आले आहे .आरोपी सागर आनंदा सुरे वय २३ गाव-पिशोरा ता कन्नड जि औरंगाबाद) याच्यावर अपहरण आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षक कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे रनजीत मारग हे करत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग ,पोलीस नाईक अजहर सय्यद , पोलीस नाईक सचिन वनवे ,पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले आदीच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.