- अहमदनगर वंचितांची सेवा हा मानवतेचा खरा धर्म आहे. जिल्ह्यातील सुफी, साधू-संतांनी मानवतेची शिकवण दिली. हीच प्रेरणा व शिकवण घेऊन मिरावली बाबा दर्गाच्या दर्शनास राज्यभरातून सर्व धर्मिय भाविक येतात. धार्मिक एकतेचे दर्शन येथे घडत असल्याची भावना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
- कापूरवाडी (ता. नगर) पहाडावर असलेल्या हजरत सय्यद इसहाक शहा उर्फ मिरावली बाबांच्या दर्गा येथे भाविक व गरजू घटकांना थंडीनिमित्त ऊबदार ब्लँकेट, कपडे, साड्या व दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट देण्यात आली. पहाडचे मुजावर साहेबान अन्सार जहागीरदार यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी *माजी मंत्री कर्डिले बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, साहित्यिक तथा कुरानचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ. जहीर मुजावर, बाबासाहेब जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता तापकिरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, रवी कर्डिले, मोहन गहिले, भैय्या बॉक्सर, मोनू जहागीरदार, प्रशांत गहिले, अॅड. योगेश नेमाणे, आरिफ जहागीरदार, शम्स जहागीरदार, अनिकेत येमुल आदींसह भाविक उपस्थित होते.*
- पुढे बोलताना कर्डिले म्हणाले की, समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरु असल्याने कोणतेही पद नसताना देखील लोकसन्मान मिळत आहे. सर्वसामान्यांकडून मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा आहे. सत्ता व पद असो किंवा नसो, सर्वसामान्यांची कामे करता आली पाहिजे. या भावनेने अविरत कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व मिरावली पहाडचा विकास करत असताना अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
- प्रारंभी डॉ. रफिक सय्यद यांनी मोहंमद पैगंबर व संत तुकाराम महाराजांचे दाखले देत आपल्या भाषणातून धार्मिक एकता व समतेचा संदेश दिला. माणसा माणसामधील भेद विसरुन साधू-संताची शिकवण आत्मसात करण्याचा उपदेश त्यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत साहेबान जहागीरदार यांनी केले. रफिक मुन्शी यांनी मिरावली पहाडचा विकासात्मक कायापालट माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला. मुलभूत प्रश्न सोडवून कोट्यावधी रुपयाचे भक्तनिवास उभारण्यासाठी भरीव निधी मिळवून दिला. प्रश्न सोडविणारा नेता लोकाभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अध्यात्मा बरोबर लोकहिताच्या कामासाठी जहागीरदार परिवार योगदान देत आहे. मिरावली पहाडचा विकास करण्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांचे मोठे योगदान आहे. पहाड परिसरात भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्याअसून, देशभरातून भाविक येथे दर्शनास येतात. धार्मिक व सामाजिक एकतेचे विचार येथून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्या बॉक्सर यांनी केले. आभार बाबासाहेब जहागीरदार यांनी मानले.
Home महाराष्ट्र अहमदनगर मिरावली पहाडवर भाविक व गरजू घटकांना ब्लँकेट आणि कपड्यांचे वाटप* *वंचितांची सेवा...