अहमदनगर – राज चेंबर ते मंगल गेट परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.
दर आठवड्याला मंगल गेट परिसरात आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी अहमदनगर शहरातील विविध गावातील शतकरी व व्यवसायदार व्यापार करण्यासाठी येतात तसेच शहरातील स्थानिक रहिवाशी व बाहेरील लोक तेथे बाजारासाठी येतात. मंगल गेट येथे कोणत्याही प्रकारची शौचालय नसल्यामुळे येणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होत आहे. यामुळे मंगल गेट येथे लोकांच्यास सोयीकरीता सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तर या मागणीचे पुढील एक महिन्यात कारवाई न केल्यास महानगरपालिकेत आयुक्त दालनात धरणे आंदोलण करु. असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी मुन्ना शेख,अनिस शेख,कदिर शेख, शब्बीर सय्यद, विकार सय्यद, रोहन, कदिर मोमीन, चंद्र केरुळकर,नासीर सय्यदआणि शेरखान पठाण यादी उपस्थीत होते.