श्रीगोंदा- रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ करून ऊसाने,काठीने तसेच खोऱ्याच्या तुंब्याने तिघाजणांना मारहाण केल्याची घटना लोणीव्यंकनाथ येळपणे रस्त्यावर काकडे वस्तीजवळ घडली होती.
नितीन आप्पा काळे, सदा अब्दुल काळे, शंकर बाळासाहेब दांगडे,(सर्व रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा) हे तिघे या मारहाणीत जखमी झाले आहेत.
या मारहाण प्रकरणी नितीन काळे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जयसिंग वीर,यांच्यासह महेंद्र हिरामण थोरात,गणेश संपत पवार,संजय दगडु पवार,उमेश पोपट खराडे, आप्पा जंबे ( पुर्ण नाव माहीत नाही )सर्व रा. पिसोरे (येळपणे), ता. श्रीगोंदा या सहा जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्यासह मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,घटनेच्या दिवशी एका विना क्रमांकाच्या टाटा हेकसा गाडीतून आलेल्या वरील आरोपींनी त्या ठिकाणी येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मला घ्यायचे होते तुम्ही कश्याला घेतले असे म्हणून जखमी झालेल्या वरील तिघांना उसाने,काठी व खोऱ्याच्या तुंब्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करत तुम्ही परत येथे कामाला आले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत उसाने मारहाण करत येळपणे पर्यत पायी नेले
या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव हे करत आहेत











