श्रीगोंदा – श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचे फेसबूक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. तसेच हॅक अकाउंटवरून अनेकांना पैशाची मागणी देखील करण्यात आली आहे.
या प्रकरणात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार तथा विद्यमान कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांची सोशल मीडियाचे अकाउंट अज्ञात इसमाने हॅक करून त्या अकाऊंटवरून अनेकांना पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे.
लोकांना वेगवेगळ्या खात्यावरून मॅसेज जाऊन पैश्याची मागणी होत होती मग त्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील एका सेवानिवृत्त अधिकारी यांचेही सोशल मीडियाचे खाते हॅक करून अनेकांना पैश्याची मागणी केली जात होती . त्यामुळे श्रीगोंदयात असे प्रकार वाढले आहेत याकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे










