महिलेवर अत्याचार : आरोपी जिल्हा मुख्यालयातील पोलीस कॉन्सटेबल.

नवी दिल्ली : देशातील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदा अंमलात आणण्याची मागणी होत असतानाच पुन्हा एका महिलेवर अत्याचार झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. माहितीनुसार सुल्तान सिंह असं आरोपी कॉंन्स्टेबलचं नाव असून त्याने पीडित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला आहे. दरम्यान पीडितेने आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारचे लोक जागे झाले. त्यांनी या नराधम पोलीस कॉन्स्टेबलला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. जखमी पोलीस कॉन्सटेबलला जिल्हा मुख्यालयातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here