*महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‌पिक‌ पाहणी नोंदीचा सातबार्याचे शेतकरयांना वितरण**महसुल विभागाचे ई-पीक पहाणी योजने अंतर्गत आनंदवाडी गावात १००टक्के पीक पाहणी*

*महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‌पिक‌ पाहणी नोंदीचा सातबार्याचे शेतकरयांना वितरण**महसुल विभागाचे ई-पीक पहाणी योजने अंतर्गत आनंदवाडी गावात १००टक्के पीक पाहणी*नगर प्रतिनिधी:महाराष्ट्र मधील शेतकरयां साठी क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली इ पिक पाहणी अँप निमीॅती करण्यात आली होती. या पिक पाहणी अँप द्वारे आनंदवाडी या गावातील १०० टक्के इ पिक पाहणी नोंद पुर्ण झाल्या या आँनलाईन पिक पाहणी अँप द्वारे आपल्याच मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकाची पिक पाहणी नोंद होत असल्याने या ठिकाणचे शेतकरी आनंदाने भारावून गेले होते. त्यामुळे आँनलाईन पीक पाहणी बद्दल आनंदवाडीच्या शेतकरी आणि आसपासच्या गावातील उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.या आनंदवाडी गावात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट बांधावर जाऊन आँनलाईन पीक पाहणीचा आढावा देखील घेतला. व ज्या ज्या शेतकऱ्यांनी आँनलाईन पीक पाहणी अँप द्वारे पिकाची नोंद केली अशा शेतकऱ्यांना ७*१२ उतार्याचे यांच्या महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here