ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप

ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप

Mumbai:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबईतील भाजप नेत्याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बुधवारी बसून राष्ट्रगीत गात होत्या, तसंच त्यांनी अर्धच राष्ट्रगीत गायलं. त्यांनी राष्ट्रगीताचा पूर्णपणे अनादर केला आहे.”

– तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदी सरकारला घेरण्याच्या, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून दिल्लीनंतर मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.

यादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील भाजपच्या एका नेत्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here