अहमदनगर – जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रिय झाली असून राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटनेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन अहमदनगर शहरात माऊली मंगल कार्यालय नवीन टिळक रोड या ठिकाणी करण्यात आले आहे.
सदर मेळावा हा रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी दुपारी अकरा वाजता होणार असून या मेळाव्या करिता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मनसे सैनिक व नागरिक उपस्थित राहणार आहेतया संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देविदास खेडकर, बाबाशिंदे, दत्ता कोते यांनी जिल्हाभर तालुकानिहाय बैठकघेउन या मेळाव्याचे नियोजन केले आहे.मनसेचे शहराध्यक्षद गजेंद्र राशिनकर जिल्हा उपाध्यक्ष मनोज राउत हे या मेळाव्याची जय्यत तयारी करत आहेत.
हे करत आहेत तरी या मेळाव्या करिता व बाळा नांदगावकर यांचे विचार ऐकण्यास करिता जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केलेले आहे.










