मंगळापुर येथील विवाहितेचा विनयभंग; नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेवासा – तालुक्यातील मंगळापुर येथे दिनांक २१/०९ /२०२१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावाच्या शिवारात जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या कडेला सदर फिर्यादी महिलेवर बापूसाहेब उर्फ बाळू गोपीनाथ गव्हाणे, गणेश बापूसाहेब बेहळे, संभाजी भाऊसाहेब गायकवाड यांनी विनयभंग केल्यावरून नेवासा पोलीस ठाण्यात दि.४/१०/२१रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनयभंगसदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वर नमूद केलेले आरोपी यांनी दारू पिऊन तू मराठ्याचा नवरा का केला तुला भिलाचा नवरा चालत नव्हता का असे म्हणून बाळू गोपीनाथ गव्हाणे याने माझा हात धरून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले माझा आवाज ऐकून माझे पती सोडवण्यास आले असता गणेश बेहळे व संभाजी गायकवाड यांनी मला व माझ्या पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.विनयभंगसदर फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४,३२३,५०४,५०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ठोंबरे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here