मुंबई – येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबर होणाऱ्या टी-20 विश्वचषकामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. 23 ऑक्टोबर हा महासामना रंगणार आहे. मात्र यापूर्वीच अनेक दिग्गज या सामन्याबद्दल प्रतिक्रिया देत आहे.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने देखील या सामन्यावर प्रतिक्रिया देत म्हणाला की आमचा संघ भारताला पुन्हा पराभूत करू शकेल. टी-20 मध्ये पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा सरस आहे. भारतीय मीडियाच आपल्या संघावर विनाकारण दबाव टाकतो. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये दोन देशांत संघर्ष होतो तेव्हा भारताचा पराभव होणे स्वाभाविक आहे.
मागच्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला होता. मात्र येत्या 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारत मागच्या वर्षी झालेल्या पराभवचा बदला घेणार की पाकिस्तान पुन्हा एकदा भारताला पराभव करणार हे पहावे लागेल.