मुंबई – 6 फरवरी पासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आता मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाचे सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा बदल करण्यात आला आहे.
मयंक अग्रवाल नंतर आता भारतीय संघात इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघातील धवन आणि ऋतुराज वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतील की नाही, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर धवन आणि ऋतुराज खेळू शकणार नसतील तर खबरदारीचा उपाय म्हणून मयांक अगरवालनंतर आता इशान किशनला भारतीय संघात पाचारण करण्यात आलेले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत इशान किशनही सलामी करताना दिसू शकतो.
पहिल्या सामन्यात रोहित शर्माबरोबर सालमीला कोण उतरणार, याचा विचार सध्या भारतीय संघ करत आहे आणि त्यांच्यापुढे चार पर्यायही उपलब्ध आहेत. सध्याच्या घडीला सलामीवीरासाठी सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव आहे वेंकटेश अय्यर. आतापर्यंत आयपीएलमध्ये वेंकटेशने सलामीवीराची भूमिका चोख पाडली आहे. त्याचचबरोबर तो संघातील सहाववा गोलंदाज म्हणूनही खेळू शकतो. भारतीय संघात आता मयांक अगरवालला स्थान देण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला भारतीय संघ वनडे विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून संघबांधणी करत आहे. त्यामुळे भारतीय संघ आत्ताच हे प्रयोग करून पाहू शकतो. त्यामुळे या मालिकेत कोणते प्रयोग केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.










