भारतात जन्मठेपेची शिक्षा ही “आयुष्यभराची” असते की फक्त १४ वर्षांची असते? वाचा..!एखाद्या गुन्हेगाराला जन्मठेप कधी सुनावली जाते हे तुम्हाला ठाऊक आहे का? ही जन्मठेप म्हणजे नेमकं काय? जन्मठेप कीती काळासाठी असते याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असल्याचं आढळून येतं!आपण चित्रपटामध्ये किंवा खऱ्या आयुष्यामध्ये हे बघितले असेल की, एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन सुद्धा त्याला १४ वर्षांनी सोडले जाते.जन्मठेप हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर खडतर तुरुंगवास, खूप श्रम आणि खूप खराब आयुष्य हे सर्व येते.आपल्याला वाटते एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप झाली तर त्याचे आयुष्य संपलेच, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नाही, त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य त्या अंधाऱ्या कोठडीमध्येचं घालवावे लागणार. पण आपण समजतो त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे.चला मग जाणून घेऊया की, जन्मठेप झालेल्या काही गुन्हेगारांना १४ वर्षाची शिक्षा भोगून झाल्यानंतर का सोडण्यात येते.भारतीय संविधानामध्ये १४ वर्षाच्या शिक्षेला जन्मठेपेची शिक्षा म्हटले जाते, असा कुठेही उल्लेख नाही.२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की, आजीवन कारावास म्हणजे जन्मभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा होय.सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की, गुन्हेगारांना जर असे वाटत असेल की १४ किंवा जास्तीत जास्त २० वर्षांनी त्यांना परत सोडण्यात येईल तर हा त्यांचा गैरसमज आहे. असा कोणताही अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.पण तरी सुद्धा हा प्रश्न उरतोच की, जर जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्हेगारांना झाली असेल तरीही ते १४ वर्षांच्या शिक्षेनंतर सुटतात कसे? त्याचे उत्तर जाणून घेऊया….सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या कैद्याला जर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर, त्या कैद्याला राज्य सरकारच्या ताब्यात दिले जाते. त्या कैद्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारचे असते.त्या कैद्याला १४ वर्ष, २० वर्ष, ३० वर्षानंतर तुरुंगातून सोडायचे की आयुष्यभर तिथेच ठेवावे याचा निर्णय फक्त राज्य सरकारच घेऊ शकते. जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला कमीत कमी १४ वर्ष सक्तमजुरी ही करावीच लागते.१४ वर्षाच्या आधी कोणत्याही गुन्हेगाराला तुरुंगातून मुक्त केले जाऊ शकत नाही.त्यानंतर त्याच्यावर निर्माण झालेल्या विश्वासाने, वागणुकीने किंवा त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याची कौटुंबिक स्थिती लक्षात घेऊन त्याला तुरुंगामध्ये ठेवण्याचा काळ निश्चित केला जातो. जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात असतो. त्याच्या वागणुकीमधील बदल लक्षात घेऊन जर गुन्हेगाराची शिक्षा कमी करायची असेल, तर सीआरपीसीच्या कलम ४३२ नुसार शासनाला योग्य ते दयापत्र पास करावे लागते.परंतु हे सुद्धा लक्षात घ्या की सीआरपीसीच्या कलम ४३३ – ए नुसार कमीत कमी १४ वर्ष शिक्षा प्रत्येक जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला भोगावीच लागेल.म्हणून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्या नंतरही आरोपीला १४ वर्षांनी तुरुंगातून मुक्त केले जाते.
- Crime
- Education
- English News
- Lawyer
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- उत्तर प्रदेश
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- खेळ
- दिल्ली
- कर्नाटक
- बंगळुरू