भर ट्रॅफिकमध्ये धोनीने रस्त्यावरच थांबवली बस; अन् पोलिसांना म्हणाला…

355

मुंबई – आयपीएल चे पंधरावा हंगामासाठी काऊंटडाऊन सुरू झाला असून आता नुकताच एक प्रोमो जाहीर करण्यात आलाय. या प्रेमामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही प्रोमोने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएलचा सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी (M.S. Dhoni) प्रोमोमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत असल्याने गोंधळ निर्माण करणे देखील अत्यावश्यक होते.

टाटा आयपीएलच्या (TATA IPL) या नवीन प्रोमोमध्ये महेंद्रसिंग धोनी दक्षिण भारतीय (South Indian) लूकमध्ये दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला धोनी बस चालवताना दिसत आहे. काही वेळातच धोनी खचाखच भरलेल्या बाजारात बस थांबवतो. ट्रॅफिक पोलिसांनी असे का केले असे विचारल्यावर धोनी त्याच मस्त शैलीत बोलतो, समोर बघ, सुपरओव्हर चालू आहे.

धोनीचे बोलणे ऐकून वाहतूक पोलीस शांतपणे तेथून निघून जातात. टाटा आयपीएलचा हा नवा प्रोमो चाहत्यांना खूप आवडला आहे. आयपीएलचा यंदाचा मोसम काहीसा बदललेला पाहायला मिळणार आहे. यावेळी 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. मेगा लिलावात अनेक बड्या खेळाडूंचे संघही बदलले आहेत.

यावेळी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow super j) रूपाने दोन नवे संघ दिसणार आहेत. लखनौ संघाचा कर्णधार केल राहुल असेल तर गुजरातची कमान हार्दिक पांड्याकडे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here