ब्रेकिंग:दोरीने बांधुन जिवे ठार मारल्याची घटना

अहमदनगर 14 सप्टेंबर 2021 :- लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी करुन हात पाय दोरीने बांधुन जिवे ठार मारल्याची घटना 

नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक येथे घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कैलास घोडके असे नाव आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक या ठिकाणी दि. 14 सप्टेंबर  रोजी रात्री 3 वा. ते दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आठवड घाटात

आरोपी संतोष तुळशीरम सुरदुसे ( रा दर्यापुर ता. दर्यापुर जि अमरावती) व मयत कैलास घोडके या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाल्याने यातील आरोपी संतोष याने मयत घोडके याला लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी केले.

यानंतर  हात-पाय दोरीने बांधून घोडके याला जिवे ठार मारले, या  संजय नवनाथ खाकाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here