बूथ हॉस्पिटलच्या सेवाभावाची नगरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल : बजरंग दरक

785

बूथ हॉस्पिटलच्या सेवाभावाची नगरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल : बजरंग दरक

नगर : कोरोनाकाळात समाजात सर्वत्र माणुसकीची प्रचिती देणारे उपक्रम सुरु आहेत. आरोग्यसेवेची शतकोत्तर परंपरा असलेल्या बूथ हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यापासून कोरोना रूग्णांची अतिशय उत्तम काळजी घेण्याचे काम एखाद्या व्रताप्रमाणे चालू आहे. महामारीच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून बूथमधील डॉक्टर, कर्मचारी रूग्णसेवा करीत आहेत. रूग्णांसाठी वरदान ठरणारे हे कार्य अतुलनीय असेच आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत हे हॉस्पिटल देवदुताप्रमाणे योगदान देत आहे. नगरच्या इतिहासात याची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असे प्रतिपादन माहेश्वरी समाजाचे बजरंग दरकर यांनी केले.

कोरोना रूग्णांवर यशस्वी उपचार करून आतापर्यंत हजारो रूग्णांना बरे करून घरी पाठवणार्‍या बूथ हॉस्पिटलच्या कार्याला सलाम करीत माहेश्वर समाजाच्यावतीने हॉस्पिटलला 100 खुर्च्या व चार टेबलची भेट देण्यात आली. हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी देवदान कळकुंबे यांनी ही मदत स्विकारली. यावेळी बजरंग दरक, महेश इंदानी, मनिष सोमाणी, महेश बिहाणी, योगेश बजाज, परेश बजाज, राहुल झंवर आदी उपस्थित होते.

महेश इंदानी म्हणाले की, लॉकडाऊन काळात माहेश्वरी समाजाने गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. कडक लॉकडाऊन सुरु असताना अनेक मजूर पायपीट करून आपापल्या गावी परतत होते. अशा प्रवाशांना मानवतेच्या भावनेतून सुमारे 6 हजार जेवणाची पाकिटे देण्यात आली. भुकेचा आधार बनताना प्रत्येकाला सकारात्मक राहण्याचा संदेश समाजाने दिला. याशिवाय समाजातील अनेकांनी वैयक्तिक स्तरावर गरजूंना मदतीचा देवून सामाजिक बांधिलकी जपली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here