मुंबई – देशातील कर्नाटक राज्यात सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब घालून प्रवेश नाकारण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा होत असून सोशल मीडियावर दोन पक्ष आमने-सामने देखील आले आहे.
मात्र देशातील बहुतेक जणांना हिजाब आणि बुरखामधील फरक माहीत नसल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. यामुळे जाणून घेऊया यामधील नेमका फरक
हिजाब
आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा आहे. कुराणमधील हिजाब कपड्यांशी संबंधित नाही, तर महिला आणि पुरुषांमधील पडदा म्हणून आहे. कुराणात मुस्लीम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सभ्य कपडे घालण्याची सूचना करण्यात आली आहे. येथे खिमर (डोके झाकण्यासाठी) आणि कपड्यांसाठी जिल्बाब (लबादा) हे शब्द सांगितले आहेत. हिजाब अंतर्गत, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सैल आणि आरामदायक कपडे घालण्यास तसेच डोके झाकण्यास सांगितले आहे.
बुरखा
भारतात मुस्लीम महिलांनी परिधान केलेल्या काळ्या कपड्यासारख्या पोशाखाला आपण अनेकदा बुरखा म्हणतो. वास्तविक बुरखा हा त्याहून वेगळा आहे. नकाबचा पुढचा स्तर म्हणजे बुरखा. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून संपूर्ण चेहरा झाकलेला असतो, तिथे बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. डोळ्यांच्या जागी एकतर खिडकीसारखी जाळी तयार केली जाते किंवा पारदर्शक कापड असते जेणेकरुन त्यातून पाहता येईल. यासोबतच संपूर्ण शरीरावर न बसणारा झगा असतो. पुरुष आकर्षित होऊ नये म्हणून ते बहुतेक वेळा एकाच रंगाचे असते.












