बिंगो जुगार अड्ड्यावर छापा, 4 आरोपीसह 24 हजाराचा मुद्देमाल ताब्यात

384

अहमदनगर – 11 फेब्रुवारी रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच जवळ काही इसम बिंगो नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर ठिकाणी जाऊन पोलीसांनी छापा टाकून रविंद्र बाळासाहेब चव्हाण,अशोक एकनाथ खंडागळे, बाबासाहेब शिवाजी कसबे आणि शाहरुख मुक्तार पठाण या आरोपींना अटक करून 23,880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तसे सर्व आरोपी विरुध्द पो. कॉ. नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे मुंबई जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, Dy.s.p संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली H.c. सुरेश औटी,P.N. सचिन बैसाणे P.c. महादेव लगड P.c नितीन शिरसाठ आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here